शिक्षण

बीएमएस, बीबीएमची अतिरिक्त सीईटीचा निकाल २८ ऑगस्ट रोजी ?

निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच प्रवेश प्रक्रिया होणार सुरू

मुंबई :

बीसीए, बीएमएस, बीबीए, बीबीएम या या व्यावसायिक अभ्यासक्रमांची अतिरिक्त सीईटी ४ ऑगस्ट रोजी पार पडली असून, या परीक्षेचा निकाल २८ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर २९ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रियेला सुरू होणार आहे.

बीसीए, बीबीए, बीएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांची सीईटी अनेक विद्यार्थ्यांना देता न आल्याने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून ४ ऑगस्ट रोजी अतिरिक्त सीईटी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २८ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच २९ ऑगस्टपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तसेच १३ सप्टेंबर रोजी या अभ्यासक्रमांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाच्या अतिरिक्त सीईटीसाठी ४९ हजार २१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये २९ हजार ७९१ मुले तर १९ हजार ४३० मुलींनी आणि ४ तृतीयपंथीयांनी नोंदणी केली आहे.

दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २९ मे रोजी बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमाची सीईटी घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण ५६ हजार २४८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४८ हजार १३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे जवळपास ६० हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.

प्रवेश प्रक्रियेचे तात्पुरते वेळापत्रक

  • अतिरिक्त सीईटी निकाल : २८ ऑगस्ट (तात्पुरती)
  • ऑनलाइन अर्जनोंदणी : २९ ऑगस्ट ते ०६ सप्टेंबर
  • अंतरिम गुणवत्ता यादी : ९ सप्टेंबर
  • हरकती व तक्रारी : १० ते १२ सप्टेंबर
  • अंतिम गुणवत्ता यादी : १३ सप्टेंबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *