शहर

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त ३ लाख अर्ज मंजूर

मुंबई :

राज्य शासनाने राज्यातील महिला, युवक-युवती,ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांना दिलासा देण्यासाठी सामाजिक न्यायाच्या विविध योजना सुरु केल्या असून या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगर जिल्ह्यात या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी करण्यात येत असून या योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाने जाहीर केलेल्या सर्व माध्यमांवर व जाहिरातींमधून या योजनांचे निकष व लाभ याबाबत माहिती घेण्याचे आवाहनही मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३ लाख ८४ हजार ८४३ अर्ज प्राप्त झाले. यातील ३ लाख १० हजार १८६ मंजूर अर्ज झाले. यातील ७१ हजार ४५९ अर्ज फेरतपासणीसाठी पाठविले आहेत. त्यातील १ हजार १५० अर्ज नामंजूर झाले आहेत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत नवीन नोंदणी झालेल्या आस्थापना शासकीय ३६, खाजगी २८, आतापर्यंत अधिसूचित झालेली रिक्त पदे २७४१, शासकीय ४०५, खाजगी २३३६, ऑनलाईन अर्ज केलेले उमेदवार २६३८, अंतिमतः निवड झालेल्या उमेदवारांची संख्या शासकीय ११, खाजगी ३००, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनेत अर्ज वाटप १०००. मुख्यमंत्री वयोश्री योजनेत अर्ज वाटप १५००, प्राप्त अर्ज १६३, वैध अर्ज ९९, इतर जिल्हयातील ६४ असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *