शिक्षण

एसएनडीटी विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील विद्यार्थिनींसाठी सीएसआर अंतर्गत बसचे लोकार्पण

चंद्रपूर : 

एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईच्या, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थिनींच्या प्रवासाच्या सोयीसाठी सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा यांच्या विशेष प्रयत्नाने वनविकास महामंडळ (FDCM) च्या सीएसआर निधी अंतर्गत बस खरेदीसाठी ३६.८० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते.

या एफडीसीएम सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त ३६.८० लक्ष रुपयामधून एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवाराने एक ४४ आसनी टाटा अल्ट्रा बस खरेदी केली. या बसचे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारपूर येथे लोकार्पण सोहळा पार पडला. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार त्यांच्या उपस्थितीत एका शाळकरी मुलाच्या हस्ते बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाच्या बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, एफडीसीएम चंद्रपूरचे विभागीय व्यवस्थापक सुमित कुमार सोबतच हरीश शर्मा आणि प्रकाश धारणे, समन्वयक वेदानंद अल्मस्त उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारातील सर्व शिक्षक, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या बसमुळे बल्लारपूर-चंद्रपूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या प्रवासाची सोय होणार आहे.

एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबईच्या, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील विद्यार्थिनींच्या प्रवासाच्या सोयीसाठी सुधीर मुनगंटीवार, मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर आणि वर्धा जिल्हा यांच्या विशेष प्रयत्नाने वनविकास महामंडळ (FDCM) च्या सीएसआर निधी अंतर्गत बस खरेदीसाठी ३६.८० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार त्यांच्या उपस्थितीत एका शाळकरी मुलाच्या हस्ते बसचे लोकार्पण करण्यात आले. या एफडीसीएम सीएसआर निधी अंतर्गत प्राप्त ३६.८० लक्ष रुपयामधून एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवाराने एक ४४ आसनी टाटा अल्ट्रा बस खरेदी केली. या बसचे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारपूर येथे लोकार्पण सोहळा पार पडला.

एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांचे बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. चंद्रपूर- बल्लारपूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना प्रवासाची सोय व्हावी याकरिता तातडीने बस उपलब्धतेसाठी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि वित्त व लेखा अधिकारी विकास देसाई यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. या बसमुळे बल्लारपूर-चंद्रपूरच्या आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या प्रवासाची सोय होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *