मुंबई :
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (MDL) आपल्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त “माझडॉक मुंबई दहा किलोमीटर चॅलेंज” च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा आज केली केली. या स्पर्धेत दहा किलोमीटर धावणे व तीन किलोमीटर कौटुंबिक सदस्यांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी www.mazdock10k.com या वेब साईटवर नोदणी सुरु झाली आहे.
ही स्पर्धा रविवार दि, १५ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित केली असून स्पर्धेला आजाद मैदानातून सुरवात होणार आहे. दहा किलोमीटर स्पर्धेला सकाळी ६.०० वाजता सुरवात होईल तर तीन किलोमीटर स्पर्धेला सकाळी ६:२० वाजता सुरवात होणार आहे. त्यासाठी १६ ते २९, ३० ते ३९, ४० ते ४९, ५० ते ५९ आणि ६० वर्षांवरील असे पुरुष व महिला वयोगटातून खेळाडू धावतील असे आयोजकांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी आयोजकांनी पाच लाखांची बक्षिसे ठेवली असून ती वेगवेगळ्या वयोगटात दिली जाणार असल्याचेही सांगितले. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकासाठी पुढील प्रमाणे पारितोषिक दिली जाणार आहेत. त्यामध्ये पुरुष व महिला असा भेद न करता सर्वांसाठी बक्षिसे समान ठेवली आहेत. १६ ते २९ वयोगटातील पहिल्या तीन क्रमांकांना रु. ५०,०००/- , रु. २५,०००/- व रु. १५,०००/-; ३० ते ३९, ४० ते ४९, ५० ते ५९ या प्रत्येक वयोगटांतील पहिल्या तीन क्रमांकांना रु. २०,०००/- , रु. १५,०००/- व रु. ७,५००/-; तर ६० वर्षांवरील वयोगटातील पहिल्या तीन क्रमांकांना रु. १५,०००/- , रु. १०,०००/- व रु. ५,०००/- अशी बक्षिसे व पदके दिली जाणार आहेत. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना एक उत्कृष्ट ड्राय-फिट टी-शर्ट, एक बॅग, स्पर्धा पूर्ण केलेल्या खेळाडूला पदक, एक जॅकेट व स्पर्धा संपल्यावर तजेलदार पेय दिले जाणार आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा (MDL) समृद्ध वारशातील महत्त्वपूर्ण घटना लोकांसमोर मांडता येतील असेही त्यांनी सांगितले. समाजात आरोग्य व फिटनेसचा प्रचार जनजागृती करणे माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे राष्ट्रीय पातळीवरील कार्य व योगदानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हे उद्दिष्ट समोर ठेऊन स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (MDL) ची स्थापना १७७४ मध्ये झाली असून तेव्हापासून ही संस्था देशासाठी काम करत आहे. आपल्या विविध कामातून समृद्ध वारसा आणि जहाजबांधणी व समुद्री विभागातील नाविन्यपूर्ण कल्पनेतून सदैव देशासाठी कार्य करत आहे. त्यातूनच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी माझडॉक मुंबईने दहा किलोमीटर चॅलेंज ही स्पर्धा सुरु केली असून या वर्षी या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.
गेल्या वर्षी जवळजवळ तीन हजार स्पर्धकांनी या स्पर्धेट सहभाग नोंदवल होता. मात्र यावर्षी हि संख्या दुप्पट म्हणजे जवळपास सहा हजार होईल असा ठाम विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.