मुंबई :
बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन येथील हॉस्पिटलमधेये विविध प्रकारच्या आजारांशी लढा देणाऱ्या बालरुग्णांसाठी दिवाळी मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये कंदील आणि दिवे बनवणे, रांगोळी काढणे, नृत्य, मनोरंजनात्मक खेळ, तोरण आणि दिवाळी भेटकार्ड तयार करणे बनवणे आणि फोटो बूथ अशा उपक्रमांचा समावेश होता. ३ ते १५ वयोगटातील ५० हून अधिक बालरुग्ण या उपक्रमात सहभागी झाले होते.
दिवाळीच्या दिवसांमध्ये संपूर्ण शहर आनंदामध्ये रंगलेले असताना असाध्य व्याधींमुळे अनेक रुग्णांना रुग्णालयामध्येच राहावे लागते. मात्र या रुग्णांचीही दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातंर्गत प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा मोलाचा संदेश याठिकाणी देण्यात आला. बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन येथील हॉस्पिटलमधेये विविध प्रकारच्या आजारांशी लढा देणाऱ्या बालरुग्णांसाठी दिवाळी मेळाव्याचे आयोजन केले होते. यामध्ये कंदील आणि दिवे बनवणे, रांगोळी काढणे, नृत्य, मनोरंजनात्मक खेळ, तोरण आणि दिवाळी भेटकार्ड तयार करणे बनवणे आणि फोटो बूथ अशा उपक्रमांचा समावेश होता. ३ ते १५ वयोगटातील ५० हून अधिक बालरुग्ण या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमातंर्गत कर्करोग, मूत्रपिंड, ह्रदयविकार आणि इतर आजारांसह ५० हून अधिक बालरुग्णांनी तयार केले कंदील हॉस्पिटलमध्ये लावले जातील, अशी माहिती वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.
दिवाळीच्या दिवसांमध्ये संपूर्ण शहर आनंदामध्ये रंगलेले असताना असाध्य व्याधींमुळे अनेक रुग्णांना रुग्णालयामध्येच राहावे लागते. मात्र या रुग्णांचीही दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी हा सकारात्मकता आणि आनंद पसरविणारा सण आहे आणि म्हणूनच या रुग्णालयातील बालरुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. याठिकाणी दिवाळीचा आनंद लूटत चिमुकल्यांना त्यांच्या वेदनांचा विसर पडला अशी प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी व्यक्त केली.