कल्याण :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघातील निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने भिवंडी बापगावहुन कल्याणला येणाऱ्या वाहतुकीच्या वाहन तपासणीत एटीएममध्ये पेशाची देवाण घेवाण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सीएमएस कॅश व्हॅनकडे कोणतेच पुरेसे कागदपत्र नसल्याने कॅश व्हॅनमधील १ कोटी २० लाखाची रोकड भरारी पथकाने जप्त करीत महसूल विभागाच्या स्वाधीन केल्याची माहिती कल्याण पश्चीम विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणुक निर्णायक अधिकारी तथा तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आचार संहिता कडेकोटपणे राबविली जात आहे. अवैध्यरित्या पैशाची, मद्य वाहतूक करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात आहे. शहरातील ठिकठिकाणी निवडणूक आयोगाने चेक पोस्ट तसेच पोलिसांच्या चौक्या तैनात ठेवण्यात आल्या असून त्याच बरोबर भरारी पथक (एफ एस टी) तयार करण्यात आल्या आहे . कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या हद्दीतील गांधारी पूलाखालील रिंग रूटजवळ चेक पोस्ट चौकी वाहन तपासणीसाठी तैनात करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सहा साडे सहाच्या दरम्यान भिवंडी बापगावंहून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या बँकेच्या एटीएममध्ये रोकड कॅशची देवाण घेवाण करणाऱ्या सीएमएस वाहनाची तपासणी केली असता या वाहनात एक कोटी २० लाख रुपयांची रोख रक्कम असल्याची माहिती दिली. मात्र रोख रकमेची तपासणी केली असता रोख रकमेत तफावत आढळून आल्याने वाहन ताब्यात घेतले. या कॅश व्हॅनमधील असलेल्या कर्मचाऱ्यांनी या रोकड बाबत योग्य ती उत्तरे न दिल्याने भरारी पथकाने कॅश व्हॅनसह एक कोटी २० लाख रूपयांची रोकड जप्त करीत महसूल विभागाकडे स्वाधीन केल्याची माहिती भरारी पथकाचे आधिकारी शिवाजी आव्हाड यांच्या कडून माहिती मिळाली.