Uncategorized

लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – अदिती तटकरे

मुंबई :

राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आज मंत्रालयात मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *