आरोग्य

Kem Hospital : केईएम रुग्णालयात मायटूल झडप बदलण्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई :

एका ६६ वर्षीय महिलेची अत्याधुनिक पध्दतीने झोपेवर उपचार करण्यात आले. मायटूल झडप दुरुस्ती ही अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात केईएम रुग्णालयामधील डॉक्टरांना यश आले आहे.

लातूरच्या रमाबाई यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अँजिओप्लास्टी केली. सुरुवातीला त्यांची प्रकृती ठीक होती. अचानक त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. तपासणीत त्यांच्या हृदयातील मायटूल झडपेमध्ये गळती असल्याचे निदर्शनास आले. अखेर त्यांच्या छातीतल्या झडप बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. या प्रक्रियेसाठी लागणारे क्लिप्स हे २० लाख रुपये किमतीचे उपकरण अगदी मोफत उपलब्ध करून देण्यात आले. परदेशात यासाठी ३५ लाख खर्च येतो. सध्या रमाबाई यांची प्रकृती उत्तम असून लवकर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

केईएममधील हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन आणि त्यांच्या टीममधील डॉक्टरांनी रमाबाई यांच्यावर पारंपरिक शस्त्रक्रिया करण्याऐवजी मायटूल झडप दुरुस्तीची अत्याधुनिक आणि कॅथेटरद्वारे केली जाणारी कमी आघाताची पद्धत निवडली. शस्त्रक्रियेत युनिट प्रमुख डॉ. चरण लांजेवार, अतिरिक्त प्राध्यापक डॉ. गिरीश सबनीस, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अंकिता कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. आदिती परस्मू तसेच इकोकार्डियोग्राफी तज्ज्ञ डॉ. गौरव शिंदे, डॉ. धीरज कुमार, डॉ. किरण राठोड, डॉ. पुण्यप्रताप कुजर तसेच ॲनेस्थेशियाच्या डॉ. संगीता उमपरकर, सीव्हीटीसीचे प्रमुख डॉ. उदय जाधव यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *