शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचा पदवी वितरण समारंभ

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या वतीने ४० विद्यार्थ्यांना व भावी पत्रकारांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तर ४ पीएचडी विद्यार्थ्यांनाही याप्रसंगी पदवी देऊन गौरवण्यात आले. हे पदवी प्रमाणपत्राचे वितरण चित्रपट व दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे निर्माते श्री. नितीन वैद्य, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक श्री. प्रसाद काथे व पत्रकार अलका धुपकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुंदर राजदीप हे उपस्थित होते. हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी संकुलातील फिरोजशहा मेहता सभागृहात पार पडला.

४ पीएचडीधारक विद्यार्थी या पदवी वितरण कार्यक्रमात विभागाचे प्राध्यापक डॉ. सागर भालेराव, राज्य निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. जगदीश मोरे, डॉ. मयूर पारीख व डॉ. अमरीन मोगर या चार विद्यार्थ्यांनी पत्रकारिता या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. या पीएचडीधारक चारही विद्यार्थ्यांनाही या कार्यक्रमात पदवी प्रमाणपत्र त्यांचा सत्कार करण्यात आला. याच पदवी वितरण कार्यक्रमात विभागातील दिव्यांशी गौर, प्रणव केळुसकर, उन्नत सांगळे व इबतीसाम शेख या चार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षातील कामगिरीबद्दल गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

याप्रसंगी चित्रपट निर्माते नितीन वैद्य म्हणाले, पत्रकारांनी समाजातील शेवटच्या व्यक्तीच्या हक्कासाठी लढले पाहिजे. माध्यमे हि दिवसेंदिवस विकसित होत आहेत त्यासाठी पत्रकारांनी नेहमी अपडेट राहायला हवे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे यांनी टीव्ही न्यूज रूमची मौल्यवान माहिती दिली. त्यांनी भावी पत्रकारासाठी भाषेचे महत्त्व स्पष्ट करून भाषा हा पत्रकारितेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे असे ते म्हणाले. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संदर्भात ते म्हणाले की, पत्रकाराने काम करताना त्याच्या ऑन-स्क्रीन दिसण्याचाही विचार करणे आवश्यक आहे. पत्रकार अलका धुपकर सामाजिक प्रश्नांवर बोलताना म्हणाल्या, महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे.

विभागप्रमुख प्रा.डॉ सुंदर राजदीप यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. ते म्हणाले, “मुंबई विद्यापीठाचा विभाग आता सर्वोच्च प्रगतीकडे वाटचाल करत आहे. विविध उद्योगांना आता या विभागासोबत काम करण्यात रस आहे. या विभागातील विद्यार्थी आता विविध संस्थांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण करत आहेत. या संस्थेचे विद्यार्थी ही विभागाची संपत्ती आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला सहायक प्राध्यापक डॉ.सागर भालेराव व सहायक प्राध्यापक रजत खामकर उपस्थित होते. हा विभाग दोन पूर्णवेळ कार्यक्रम चालवतो एक म्हणजे मास्टर ऑफ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन आणि दुसरा मास्टर ऑफ जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन इन स्ट्रॅटेजिक आणि इंटिग्रेटेड कम्युनिकेशन.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *