शहर

महिला दिनी महिला उद्योजकांनी लुटला आगळ्यावेगळ्या बोट पार्टीचा आनंद

मुंबई :

महिला दिनानिमित्त महिला उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी ११ मार्च रोजी एका आगळीवेगळ्या बोट पार्टीचे ‘गेटवे क्विन’ ह्या बोटीत आयोजन करण्यात आले होते. ६० पेक्षा अधिक महिला या समारंभाला उपस्थित होत्या. १९८० साली मराठी उद्योजकांना संघटित करण्यासाठी स्थापन झालेल्या MCC (मराठी चेंबर ऑफ कॉमर्स) संस्थेतर्फे ह्या बोट पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती अनघा बेडेकर यांनी दिली.

उपस्थित महिलांनी आपल्या व्यवसायाची थोडक्यात माहिती सांगितली. काही जणींनी आपली टॅग लाईन सांगून आणि कवितेतून आपल्या व्यवसाय बद्दलची माहिती सर्वांना दिली. कौतुक करण्यासारखी गोष्ट म्हणजे जमलेल्या सगळ्या महिलांनी आपली व्यावसायिक जबाबदारी सांभाळून आपण समाजाचे काही देणे लागतो ह्याची जाणीव ठेवून समाज कार्य देखील आपल्या परीने करत आहेत हे महत्वाचे.

संस्कृत संभाषण वर्ग, गाण्याचे शिक्षण आणि विद्यादान देणाऱ्या, वैद्यकीय सल्ला, खाद्यपदार्थ, योग प्रशिक्षक, विविध उत्पादने विकणाऱ्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांशी ओळख झाली. एकाच छताखाली अचानक अनेक मैत्रिणी मिळाल्या, ह्याचा महिलांना आनंद झाला. सगळ्यांनी एकमेकांना सहाय्य करण्याची तयारी दर्शवली. बोटीत सर्व महिलांचे कॉफी देऊन स्वागत करण्यात आले होते. चणेदाण्याच्या पुड्या दिल्यामुळे सर्वांना बालपण आठवले. खेळ, स्पॉट प्राईझ, गाणी हे सर्व कार्येक्रम चालूच होते. डी. जे. च्या गाण्यांवर ताल धरून सर्व महिलांनी मनमुराद आनंद लुटला. भोजनाची व्यवस्था मीनल किचनकडून करण्यात आली होती.

ह्या सर्व कार्यक्रमासाठी बोटीचे मालक सौ. किरण महेश बापट आणि MCC व्यवस्थापक मंडळाचे महेश बापट यांनी खूप चांगली व्यवस्था केली होती. हा कार्यक्रम उत्तम करण्यासाठी MCC व्यवस्थापक मंडळातील चित्रा जठार, सह कार्यवाह अनघा बेडेकर आणि MCC कार्यालयातील हर्षला धुरंदर यांनी पुढाकार घेतला होता. वकील गायत्री जोशी, अर्चना देशमुख, पूनम देशपांडे, मनाली वझे यांनी देखील कार्यक्रमात सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *