मनोरंजन

सई ताम्हणकर, अमृता खानविलकर यांच्या नंतर आता संस्कृती बालगुडेसुद्धा बॉलिवुडमध्ये झळकणार!

मुंबई : 

सध्या अनेक कलाकार मराठीच्या सोबतीने बॉलिवुडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकताना दिसतात. बॉलिवुड गाजवणारी ही मराठी कलाकार मंडळी बॉलिवुडमध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करत असून बॉलिवुडमध्ये मराठीच नाव मोठं करताना दिसतात. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, प्रिया बापट, वैभव तत्ववादी, गिरिजा ओक यांच्या बॉलिवुड पदार्पणानंतर आता अभिनेत्री संस्कृती बालगुडे देखील एका बॉलिवुड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. हे मराठी कलाकार हिंदी इंडस्ट्रीत अनोख्या अभिनय कौशल्याने चर्चेत आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारे हे मराठी कलाकार हिंदीत चर्चेचा विषय ठरतात.

सई ताम्हणकर : हंटर , मिमी आणि आता ‘भक्षक’ सारख्या नावाजलेल्या चित्रपटात काम करून सई ताम्हणकर पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये झळकली आहे. आगामी काळात ती अजून एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

अमृता खानविलकर : ‘लुटेरा’ या आगामी वेब सीरिजमधून अमृता पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये जोरदार पदार्पण करणार असून तिने राझी, मलंग सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप बॉलिवुडमध्ये पाडली होती.

प्रिया बापट : प्रिया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या भूमिका साठी ओळखली जाते. रफुचक्कर, सिटी ऑफ ड्रीम्स सारख्या उत्तम बॉलिवुड प्रोजेक्टमध्ये प्रिया दिसली होती.

संस्कृती बालगुडे : अभिनय, नृत्य आणि अनेक कलांची आवड जोपासणारी अभिनेत्री म्हणून संस्कृती बालगुडे ओळखली जाते. संस्कृती लवकरच एका बॉलिवुड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. बॉलिवुड अभिनेता शारिब हाश्मी सोबत ती या हिंदी- इंग्रजी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. हा बॉलिवुड प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे, कोणासोबत असणार आहे या बद्दल काही समजलं नसल तरी लवकरच याबद्दल ती अधिकृत माहिती देणार असल्याचं कळतंय. संस्कृती बालगुडे ही कायम फॅशन, नृत्य आणि तिच्या अभिनयासाठी चर्चेत असते. आता ती बॉलिवुडमध्ये सुद्धा पदार्पण करणार आहे.

वैभव तत्ववादी : आर्टिकल ३७० मधून वैभवने पुन्हा एकदा बॉलिवुडमध्ये दमदार पदार्पण केलं आणि प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक देखील झालं. बाजीराव मस्तानी, हंटर, लिपस्टिक अंडर माय बुरखा अशा अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट्समधून वैभव दिसला.

मराठी कलाकारांनी बॉलिवुडमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडण हे नक्कीच कौतुकस्पद आहे. येणाऱ्या काळात अजून कोण कलाकार बॉलिवुडमध्ये झळकणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *