शहर

मतदानासाठी मतदान ओळपत्राशिवाय आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, बँक पासबुकचाही पर्याय उपलब्ध

ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत,

ठाणे :

ज्या मतदारांकडे मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र नाही अथवा वेळेत मिळवू शकणार नाहीत, अशांसाठी अन्य छायाचित्रासह असणारी ओळखपत्र पर्याय असणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.

काही मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास अथवा त्यांच्या ओळखपत्रामध्ये काही शुद्धलेखनाच्या चुका, छायाचित्र वगैरे जुळत नसल्यामुळे मतदाराची ओळख प्रस्थापित करणे शक्य नसल्यास मतदाराला भारत निवडणूक आयोगाने परिच्छेद ७ मध्ये नमूद केलेली ओळखपत्रे पर्याय असणार आहेत. यात आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक व टपाल कार्यालयाने छायाचित्रासह दिलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, एनपीआर अंतर्गत आरजीआयने दिलेले स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह निवृत्तीवेतन दस्ताऐवज, केंद्र, राज्य सरकार, पीएसयू, पब्लिक लिमिटेड कंपनीच्या कर्मचाऱ्याचे छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार, एमएलसी यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण भारत सरकारतर्फे मिळालेली दिव्यांग आयडी कार्ड (युडीआयडी) यांचा समावेश आहे.

यापैकी एक ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणे हा मतदारांना पर्याय असला तरी, मतदारांनी मतदार ओळखपत्रे तयार करुन घेण्यास प्राधान्य द्यावे. लोकप्रतिनिधी कायदा १९५० च्या कलम २० ए अंतर्गत मतदार यादीत नोंदणी केलेले परदेशी मतदार त्यांच्या भारतीय पासपोर्टमधील तपशिलाच्या आधारे ओळखले जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *