शिक्षण

निवडणुकांमुळे सीईटीच्या तारखा बदलल्या; एमएचटी सीईटीच्या परीक्षा या तारखेपासून होणार सुरू

सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले असून सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली एमएचटी सीईटी यापूर्वी १६ एप्रिल रोजी सुरु होणार होती आणि ३० एप्रिलला संपणार होती

मुंबई :

लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर सीईटी सेलने परीक्षा तारखा बदलल्या आहेत. आतापर्यंत १० परीक्षा झाल्या असून एप्रिल आणि मे महिन्यात होत असलेल्या ८ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल केला आहे. पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी(पी अँड ओ) या सीईटी तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

सीईटी सेलने सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले असून सुमारे ७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली एमएचटी सीईटी यापूर्वी १६ एप्रिल रोजी सुरु होणार होती आणि ३० एप्रिलला संपणार होती आता ही परीक्षा २२ एप्रिलनंतर होणार आहे. पीसीबी गटाची परीक्षा २२, २३, २४, २८, २९, ३० एप्रिल या तारखांना होणार आहे. तर पीसीएम गटाची परीक्षा २, ३, ४, ५ मे, ९, १०, ११ मे, १५, १६ मे रोजी होणार आहे. एएसी सीईटीची त्याच तारखेला म्हणजे १२ मे रोजीच होणार आहे. बीए/बीएससी, बीएड (4 वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स)ची सीईटी २ मे रोजी होणार होती. ती आता १७ मे रोजी होणार आहे. एमएएचएलएलबी (पाच वर्षे) ही परीक्षा ३ मे रोजी होणार होती आता नव्या तारखांमध्ये १७ मे रोजी होणार आहे. सुधारित वेळापत्रकांची माहिती विद्यार्थ्यांनी घेऊनच परीक्षेला उपस्थित राहावे असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

अशा आहेत सुधारित तारखा

  • एमएच-नर्सिंग सीईटी – १८ मे
  • एमएएच-बीएचएमसीटी सीईटी – २२ मे
  • एमएएच-बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी – २७ ते २९ मे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *