शहर

प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे

मुंबई : 

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत जुहू परिसरा तमतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला. मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव असून प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे.

‘माझा संकल्प द्वारे’ मतदानाबाबत शपथ

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उपनगरमध्ये मतदार जागृती मोहीम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून उपनगरातील विविध विभागात प्रतिज्ञा घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुंबई महानगर पालिका विशेष कार्य अधिकारी तथा मुंबई स्वीप’ अभियानाचे समन्वय अधिकारी डॉ सुभाष दळवी यांच्या उपस्थितीमध्ये सहाय्यक अभियंता तथा ‘स्वीप’चे सहाय्यक नोडल अधिकारी सुनील पानसकर यांनी ‘माझा संकल्प द्वारे’ मतदानाबाबत शपथ दिली. यावेळी संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.

मतदार नोंदणीबाबत आवाहन

के/पश्चिम विभागात पुष्पा नरसी पार्क, व्ही. एम. रोड व एन. एस. रोड नंबर १० आणि परिसरातील जोड रस्ते या ठिकाणी मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी घन कचरा व्यवस्थापन करणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांसमवेतच परिसरातील नागरिकांनाही नवीन मतदार नोंदणी, मतदान ओळखपत्रातील नाव बदलणे अथवा रहात असलेल्या ठिकाणांचा पत्ता बदलणे याबाबत ‘स्वीप’ अभियानाचे समन्वय अधिकारी डॉ सुभाष दळवी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. दळवी यांनी नव मतदार नोंदणी आणि मतदार यादीतील नावात बदल ऑनलाइन करण्यासंदर्भातील प्रात्यक्षिक दाखवले आणि अधिकाअधिक मतदारांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

मतदार नोंदणीसाठी हेल्पलाईन आणि ॲप

मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे. मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक १८००२२१९५० यावर संपर्क करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *