शहर

कंगणा रनोतबाबत आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

मुंबई :

हिमाचल प्रदेशातील मंडी मतदार संघात निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार अभिनेत्री कंगना रनौत यांच्याबद्दल सोशल मीडिया हॅंडलवरुन आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर राज्य महिला आयोगाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना सचिव व प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी २५ मार्च २०२४ रोजी अभिनेत्री कंगना रनोत यांच्याबद्दल समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. सुप्रिया श्रोनेत यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून २५ मार्च २०२४ रोजी कंगना रनोत यांचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘मंडीत (बाजारात) सध्याचा दर काय आहे हे कोणी सांगू शकेल का?” अशी वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली होती.

कंगनाबाबत अशाप्रकारे अत्यंत घृणास्पद व आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सुप्रिया श्रीनेत यांच्यावर राष्ट्रीय महिला आयोगाने कारवाई सुरू केली आहे. या आक्षेपार्ह पोस्टची राज्य महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेऊन सुप्रिया श्रीनेत यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. मनीषा कायंदे यांनी केली आहे. आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून यासंदर्भात कारवाईची मागणी केली.

आपल्यासारख्या हजारो महिला आपल्या क्षेत्रात स्वाभिमानाने काम करत असताना अशा प्रकारे व्यक्तिगत पातळीवर अपमानजनक टिपण्णी करणे अशोभनीय आहे. अशा अपप्रवृत्तींना वेळीच आवर घालणे आवश्यक असे आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *