शहर

कल्याण लोकसभेत श्रीकांत शिंदेविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडे तुल्यबळ उमेदवाराचा अभाव

शिवसेना (U.B.T.) वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे सुधीर वंडारशेठ पाटील यांना उमेदवारी

कल्याण : 

महायुतीमध्ये जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. युतीतील तिन्ही घटकपक्षांत काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. काही जागांवर मात्र भाजपने आपले उमेदवार जाहीर केले असून ठाकरेंची शिवसेना, अजित पवार  यांच्या राष्ट्रवादीनेही आपले काही उमेदवार ठरवलेले आहेत. यात कल्याणच्या जागेचाही समावेश आहे. महायुती कल्याण मधून खासदार श्रीकांत शिंदे यांना तिकीट देणार आहे. शिवसेना (U. B. T)कडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट )पक्षाचे सुधीर वंडारशेठ पाटील यांच्या नावाची चर्चा आहे

सुधीर पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शरद पवार गट ) ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. तसेच सरपंच, पंचायत समिती सदस्य अशा अनेक पदांचा पदभार त्यांनी उत्कृष्ट रित्या सांभाळला आहे. एक सुशिक्षित,युवा, कार्यक्षम, आगरी चेहरा,सामान्यांची जाण असणारे उमेदवार म्हणून सुधीर पाटील यांच्या कडे पाहिले जात आहे. सुधीर पाटील यांच्या नावाला प्रचंड लोकांची पसंती मिळताना दिसत आहे. त्यामुळे कल्याण लोकसभेची निवडणूक अतिशय लक्ष वेधणारी असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *