क्रीडा

सब ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १५ खेळाडू आणि २ व्यवस्थापक असा एकंदर १७ जणांचा चमू वाराणसी येथे रवाना झाला

मुंबई :

४६ वी सब ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा २८ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान जीवन दीप शिक्षण संस्था, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे १५ खेळाडू आणि २ व्यवस्थापक असा एकंदर १७ जणांचा चमू वाराणसी येथे रवाना झाला असून संघातील खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे वातानुकूलित रेल्वे प्रवास व्यवस्था, २ सेट गणवेश व प्रत्येकी १००० रुपये प्रवास भत्ता अशी सुविधा देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार यांनी दिली.

महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे

  • १४ वर्षा खालील (सब ज्युनिअर गट) मुले : आयुष गरुड, रुद्र गवारे, वेदांत राणे, द्रोण हजारे, ध्रुव भालेराव, प्रसाद माने
  • १२ वर्षां खालील (कॅडेट गट) मुले : नील म्हात्रे, अनंत जैन (नंदू सोनावणे, संघ व्यवस्थापक)
  • १४ वर्षा खालील (सब जुनिअर गट) मुली : तनया पाटील, स्वरा मोहिरे, पूर्वा केतकर, स्वरा कदम, जिशा आसलडेकर
  • १२ वर्षा खालील (कॅडेट गट) मुली : दुर्गेश्वरी धोंगडे, निधी सप्रे (माधवी आसलडेकर, संघ व्यवस्थापक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *