क्रीडा

४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला पुरुष एकेरी गटाने सुरुवात

मुंबई :

रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वरच्यावतीने व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला पुरुष एकेरी गटाने सुरुवात झाली. तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू व प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसांगी रोटरी क्लब ऑफ पार्लेश्वर मुंबईच्या अध्यक्ष डॉ मोनिका टंडन, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे अधिकारी व प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे ट्रस्टी मकरंद येडुरकर उपस्थित होते.

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत मुंबईच्या कुणाल राऊतने मुंबईच्या विपुल बाबरियावर २५-१६, ११-२३, २५-४ असा तीन सेटमध्ये पराभव करत चौथी फेरी गाठली. तर दुसरीकडे मुंबईच्या दिनेश केदारने मुंबईच्याच राहुल सोळंकीवर २५-१४, १०-१६, २५-२१ अशी मात करून चौथ्या फेरीत आगेकूच केली.

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल

  • जावेद शेख (मुंबई उपनगर) वि वि संजय मणियार (मुंबई उपनगर) १०-२२, २३-०९, २५-११
  • समीर अन्सारी (ठाणे) वि वि मयूर जाधव (मुंबई) २५-२१, २५-६
  • पंकज पवार (मुंबई) वि वि कालिदास चौहान २५-७, १७-२३, २५-१
  • ओंकार टिळक (मुंबई) वि वि किरण सोमण (रायगड) २५-३, २५-७
  • अमोल सावर्डेकर (मुंबई) वि वि कल्पेश नलावडे (मुंबई उपनगर) २५-९, १४-७
  • अभिजित त्रिपनकर (पुणे) वि वि जावेद नाखवा (मुंबई) २५-५, २५-११
  • सुखबिर सिंग कटनोरिया (पुणे) वि वि संजय मांडे (मुंबई) १९-२३, २२-४, २५-१३
  • सतिश खरात (मुंबई उपनगर) वि वि नरसिंगराव सकारी (मुंबई उपनगर) १९-१३, १६-१५
  • भरत कोळी (मुंबई) वि वि संदेश अडसूळ (मुंबई) २५-०, ८-२५, १९-४
  • रहिम खान (पुणे) वि वि सज्जाद शेख (मुंबई उपनगर) १९-१८, २३-२१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *