मुंबई :
महामारीच्या प्रादुर्भावानंतर जगभरातील व्यक्ती आरोग्याबाबत अधिक सजग होण्यासोबत जीवनशैलीमध्ये बदल करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. व्यक्तींच्या आरोग्यासंबंधित बदलत्या गरजांना उत्तमप्रकारे जाणून घेण्यासाठी ॲबॉट या जागतिक हेल्थकेअर कंपनीने आयपीएसओएसच्या सहयोगाने ‘हेल्दी लिव्हिंग : द रोल ऑफ व्हिटॅमिन सी’ या शीर्षकाखाली देशात केलेल्या सर्वेक्षणामधून १० पैकी जवळपास ७ व्यक्तींचे आरोग्य व रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी दररोज व्यायामाबरोबरच व्हिटॅमिन सी पातळ्या योग्य प्रमाणात राखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.
आयपीएसओएसने मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, कोची, अहमदाबाद व पुणे या नऊ शहरांमधील २,००० हून अधिक व्यक्तींचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये ५२ टक्के नागरिकांनी पावसाळा व हिवाळ्यादरम्यान व्हिटॅमिन सी सप्लीमेंट्सचे सेवन केल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाल्याचे सांगितले. तर ६१ टक्के महिलांना व्हिटॅमिन सी आजारामधून लवकर बरे करण्यामध्ये गुणकारी असल्याचे आढळल्याचे मान्य केले. तर जवळपास ६० टक्के लोकांनी व्हिटॅमिन सीमुळे आजारामधून लवकर बरे होण्यास मदत झाल्याचे सांगितले. ६५ टक्के नागरिकांना वाटते की, व्हिटॅमिन सप्लीमेंट्स एकूण आरोग्य उत्तम राखण्यामध्ये मदत करतात आणि ५२ टक्के नागरिकांचे मत आहे की व्हिटॅमिन सी हाडांचे व सांध्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करू शकते. ७३ टक्के नागरिक पुरेशा प्रमाणात पाणी पितात आणि आजारामधून लवकर बरे होण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘व्हिटॅमिन सीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, जसे शरीराची रोगप्रतिकारशक्ती व हाडे मजबूत करते, रक्तामध्ये लोहाचे शोषण वाढवते, जखम लवकर बरी होण्यास मदत होते, हिरड्या आरोग्यदायी राहतात. म्हणून, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे अपूर्ण पोषण मिळते. व्हिटॅमिन सीचे सतत सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यासह मधुमेहसारख्या असंसर्गजन्स आजारांनी पीडित व्यक्तींना फायदा देखील होतो, ज्यांना कदाचित उच्च प्रमाणात व्हिटॅमिन सी ची गरज भासू शकते, असे मुंबईतील सुचक हॉस्पिटलचे कन्सल्टिंग फिजिशियन व कार्डियोलॉजिस्ट डॉ. केतन मेहता यांनी सांगितले.
‘व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी युक्त सप्लीमेंट श्वसनविषयक आजारांना प्रतिबंध व उपचार करण्यासाठी ओळखले जाते. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
– डॉ. कार्तिक पीतांबरन, डायरेक्टर, ॲबॉट इंडियाच्या मेडिकल अफेअर्सचे असोसिएट