क्रीडा

श्रीलंकेने कोरले इंग्लंड-एशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धेवर नाव

भारतीय पुरुषांचा अंतिम फेरीत ८५ धावांनी दारूण पराभव

कोलंबो :

जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या (WICF) मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारताचा दारूण पराभव करत इंग्लंड-एशिया कपावर नाव कोरले. या सामन्यात श्रीलंकेने भारताचा ८५ धावांनी दणदणीत पराभव केला.

अंतिम सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ८६ धावा केल्या. सुरवातीला भारताने सामन्यावर पकड निर्माण केली होती. मात्र फलंदाजी करताना भारतीय संघ ढेपाळताना दिसला. खरतर साखळीत भारताविरुध्द श्रीलंकेने ९९ व १०३ धावा केल्या होत्या पण भारताने अंतिम सामन्यात ८६ धावात श्रीलंकेला रोखण्यात यश मिळवले होते. मात्र फलंदाजांनी हाराकिरी केल्याने या सामन्यात भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंकेच्या चार जोड्यांनी अनुक्रमे ६, २९, ३६ व १५ धावा केल्या होत्या. मात्र प्रतीउत्तारादाखल भारताच्या चार जोड्यांनी अनुक्रमे -११, -९, ६ व १५ धावा केल्याने भारत ८५ धावांनी पराभूत झाला. या सामन्यात भाताच्या सुरज रेड्डीने (१४ धावा व १ बळी), दैविक राय (६ धावा व १ बळी) कार्तिक सुब्रमनियन (१ धाव व ४ बळी) यांनी सामन्यात जोरदार लढत दिली. तर श्रीलंकेच्या चांडीमा (२० धावा व ३ विकेट), दिलसारा ससांका (१७ धावा व २ बळी), कोलीथा हापुअराच्ची (१२ धावा व २ बळी), अँडी सोलोमोन्स (१६ धाव व २ बळी) तर रुमेश परेरा (२ धावा व ४ बळी) यांनी जोरदार खेळाचे प्रदर्शन करत इंग्लंड-एशिया कपावर नाव कोरले.

महिलांमध्ये इंग्लंडला विजेतेपद

महिलांच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा १३५-५३ असा ८२ धावांनी मोठा पराभव करत इंग्लंडने चषक उंचावला. या सामन्यात इंग्लंडच्या उना परमजोथी (२३ धावा व ३ बळी), लुसी वेस्टोन (२३ धावा व १ बळी), मेलोरी शॉर्ट (२० धावा व १ बळी) व एमी कोल्क़ुहौन (१७ धावा व ३ बळी) यांनी सामन्यात विजयी कामगिरी केली. तर श्रीलंकेच्या धुनुजी फर्नांडो (२२ धावा ), मिहिडी सानुदिनी (१६ धावा व १ बळी), उत्कृष्ट खेळल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *