शहर

दिव्यांग आणि ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम’ ॲप

वाहतूक व्यवस्था, व्हील चेअर इत्यादी प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार

मुंबई :

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये दिव्यांग आणि ८५ पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सक्षम’ नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सुविधेचा सर्व गरजू मतदारांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘सक्षम’ ॲप डाऊनलोड करून लाभ घ्यावा असे आवाहन मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले आहे.

सहाय्यतेसाठी मागणी नोंदविता येणार

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम दिव्यांग मतदारांनी आपल्या मोबाइल मध्ये ‘सक्षम’ ॲप डॉऊनलोड करून घावे. त्यानंतर ज्या मतदाराचे खाते यापूर्वी भारत निवडणूक आयोगाच्या कोणत्याही ॲपमध्ये नोंदणी केली असल्यास त्यांनी सक्षम ॲपमध्ये त्याचा User Id व Password द्वारे Login करून सहाय्यतेची मागणी नोंदविण्यात येईल. तसेच ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली नसल्यास त्यांनी सक्षम ॲपमध्ये स्वतःचे User Login तयार करून सहाय्यतेची मागणी नोंदविण्यात येईल. निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरिता दिव्यांग व ८५ पेक्षा जास्त वय असलेले वयोवृद्ध मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती ॲपमध्ये भरावी. या सक्षम ॲपद्वारे मतदानादिवशी मतदानासाठी लागणाऱ्या सहाय्यतेची मागणी नोंदविता येईल. त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाचे केंद्र व निवासाचे स्थान निश्चिती करणे यंत्रणेला शक्य होईल.

वाहतुक व्यवस्था, व्हील चेअरची सुविधा

या ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था, व्हील चेअर इत्यादी प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार असल्याने या ॲपचा जास्तीत जास्त वापर दिव्यांग आणि ८५ पेक्षा जास्त वय असलेले वयोवृद्ध यांनी करावे असे आवाहन मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *