शिक्षण

मुंबई विद्यापीठाचा बीए सत्र ६ चा निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर

मुंबई :

मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीए सत्र ६ या महत्वाच्या परीक्षेचा निकाल काल रात्री जाहीर केला आहे. या परीक्षेत ४,६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ४९.३१ एवढी आहे. विद्यापीठाने वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेच्या निकालाबरोबरच मानव्य विद्याशाखेचा निकालही ३० दिवसाच्या आत जाहीर केला आहे.

या परीक्षेत १३,३०१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १२,६९७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये ४,६७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर ४८०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ४९.३१ टक्के एवढा लागला आहे. ६०४ विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. ४५ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर २२४३ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित (Confirm) न झाल्याने ९२८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

मूल्यांकन वेळेवर होण्यासाठी एक विशेष टीम कार्यरत होती. याला सर्व प्राध्यापक व प्राचार्यांचे सहकार्य मिळाले. तसेच कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू अजय भामरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे, सल्लागार डॉ. प्रसाद कारंडे व मानव्य विद्या शाखेचे अधिष्ठाते यांनी विशेष लक्ष दिले. कॅप विभाग, निकाल कक्ष व सीसीएफ मधील अधिकारी व कर्मचारी यांनी सदर निकाल जाहीर करण्यासाठी परिश्रम घेतले.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या उन्हाळी सत्राचे ७४ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

एकही निकाल राखीव नाही

या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून यामुळे एकाही विद्यार्थ्याचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *