क्रीडा

राज्य कॅरम स्पर्धा –  माजी राष्ट्रीय विजेता संजय मांडेची उपांत्य फेरीत धडक 

कोल्हापूर :

श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम, नरसोबावाडी, कोल्हापूर येथे सुरु असलेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उप उपांत्य सामन्यात माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संजय मांडेने फार्मात असलेल्या मुंबईच्या विकास धारियाला १९-१४, २५-६  असे सरळ दोन सेटमध्ये हरवून उपांत्य फेरी गाठली. महिलांच्या उप उपांत्य सामन्यात रत्नागिरीच्या केशर निर्गुणने मुंबईच्या नेहा कुमारीला २२-१६, १८-८ असे हरवून आगेकूच केली.

पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल

  • रहिम खान (पुणे) वि वि अभिजित त्रिपणकर (पुणे) १४-१०, २५-५
  • प्रशांत मोरे (मुंबई) वि वि पंकज पवार (मुंबई) २१-६, ०-२३, २५-६
  • संदीप दिवे (मुंबई उपनगर) वि वि झैद अहमद फारुकी (ठाणे) २५-२१, २४-११

महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल

  • काजल कुमारी (मुंबई) वि वि अंजली सिरीपुरम (मुंबई) २४-२२, २४-१९
  • आकांक्षा कदम (रत्नागिरी) वि वि उर्मिला शेंडगे (मुंबई) २५-०, २५-२१
  • प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर) वि विप्रिती खेडेकर (मुंबई) २५-११, २४-७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *