पावसाळा सुरू झाला की चाहूल लागते ती सण आणि उत्सवांची… महाराष्ट्राच्या महाउत्सव म्हणजेच गणेशोत्सव…. आणि या गणेशोत्सवांचा राजा म्हणजे सर्व गणेशभक्तांचा लालबागचा राजा…. आज सकाळी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने लालबागच्या राजाचे पारंपारीक पाऊल पूजन केले…. पाऊल पूजनानंतर लालबागाच्या राजाची मूर्ती घडवण्यास सुरवात होते…. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवांचे पडघम लालबागाच्या राजाच्या पाऊल पूजनाने होते.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे लालबागच्या राजाचे ९१ व्या वर्षाचे गणेश मुहूर्त पूजन मंगळवार दिनांक ११ जून २०२४ रोजी सकाळी ठीक ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब सुदाम कांबळे व मूर्तीकार कांबळी आर्ट्स चे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत संपन्न झाले.तद्प्रसंगी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे पूजन केले.