मुंबई :
एमएचटी सीईटीच्या गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत असलेल्या कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रवेश प्रक्रियेला गुरुवारी सायंकाळपासून सुरूवात झाली. १७ हजार ९२६ जागांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी २७ जुलैला जाहीर होणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) देण्यात आली.
कृषी शिक्षणामध्ये बी.एस्सी कृषी, बी.एस्सी उद्यानविद्या, बी.एस्सी वनविद्या, बी.एफएस्सी मत्स्यशास्त्र, बी.टेक अन्न तंत्रज्ञान, बी.टेक जैवतंत्रज्ञान, बी.टेक कृषी अभियांत्रिकी, बी.एस्सी सामुदायिक विज्ञान, बीएस्सी कृषी व्यवसाय व्यवस्थापन अशा नऊ अभ्यासक्रमांना एमएचटी सीईटीच्या माध्यमातून प्रवेश दिले जातात. एमएचटी सीईटीच्या परीक्षेचा निकाल १५ जून रोजी जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण करून ४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई व कृषी विभागाचे समन्वयक परीक्षा समन्वयक डॉ. मंगेश निकम यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची सुरूवात कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाने झाली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये २०३ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ९२६ जागा आहेत. यामध्ये शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६८६ जागा तर खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार २४० इतक्या जागा आहेत.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
- केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे अपलोड : ४ जुलै
- अंतरिम गुणवत्ता यादी : १९ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- यादीवर हकरत व तक्रार नोंदणी : २० ते २२ जुलै
- तक्रारींची यादी प्रसिद्ध : २३ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : २४ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- पहिली प्रवेश यादी : २७ जुलै (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोर्टिंगचा कालावधी : २८ ते ३० जुलै (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- दुसर्या फेरीची यादी : २ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोर्टिंगचा कालावधी : ३ ते ५ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- तिसर्या फेरीची यादी जाहीर : ८ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. नंतर)
- रिपोर्टिंगचा कालावधी : ९ ते ११ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- महाविद्यालयात कागदपत्रे व आवश्यक शुल्क भरण्याचा कालावधी : ९ ते १२ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा. पर्यंत)
- केद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशिल जाहीर : १३ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.नंतर)
- केद्रीभूत केंद्रनिहाय प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा तपशिल जाहीर : १३ ऑगस्ट (सायंकाळी ५.३० वा.नंतर)
- महाविद्यालयस्तरावर प्रवेश फेरी : २३ ते २६ ऑगस्ट
- वर्ग सुरु होणार : १६ ऑगस्ट
- प्रवेश प्रक्रिया संपणार : २६ ऑगस्ट