क्रीडा

व्यावसायिक पुरुष – मध्य रेल्वे, रचना नोटरी उपांत्य फेरीत

मुंबई :

मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने विद्यार्थी क्रीडा केंद्र आयोजित किशोर गट (४ फुट ११ इंच) व व्यावसायिक पुरुष – महिला गटाच्या खो-खो स्पर्धा लाल मैदान परळ येथे आज काही अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक सामने खेळले गेले. ही स्पर्धा २६ जानेवारी २०२५ पर्यंत चालणार आहे. किशोर गट, व्यावसायिक महिला व पुरुष गटात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळाला. किशोर गट व व्यावसायिक महिला गटाच्या स्पर्धा सुपर लीग पद्धतीने खेळवल्या जात आहेत तर व्यावसायिक पुरुष संघाचे सामने बाद पध्दतीने खेळवले जात आहेत.

किशोर गटाच्या सामन्यांचा थरार

४ फुट ११ इंच किशोर गटाच्या पहिल्या सामन्यात सरस्वती स्पोर्ट्स क्लबने ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराचा (४-२-११-७) १५-९ असा ६ गुणांनी पराभव केला. सरस्वती तर्फे मेहक अडवडेने नाबाद १, १ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ७ गडी बाद केले. वरुण गुप्ताने ५, १ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. शिवम झाने १, १ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. ओम समर्थतर्फे निहाल शिंदेने ५:३०, २, नाबाद १ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. देवेंद्र शिंदेने १, १:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले.

४ फुट ११ इंच किशोरांच्या दुसऱ्या सामन्यात ओम साईश्वर सेवा मंडळाने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा (४-२-२-२) ६-४ असा २ गुणांनी पराभव केला. ओम साईश्वरतर्फे अधिराज गुरवने ४, नाबाद ४:१० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. शातिक गामीने १:४०, २:५० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. आरव साटमने नाबाद १:२० मिनिटे संरक्षण केले. विद्यार्थी तर्फे पवन गुरवने २:२०, ४:४० मिनिटे संरक्षण केले. ओमकार जाधवने २:१०, नाबाद २:२० मिनिटे संरक्षण केले.

व्यावसायिक महिला गटात चुरशीच्या लढती

व्यावसायिक महिला गटाच्या  पहिल्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने  मुंबई पोलीस संघाचा (८-४-२-५)  १०-९ असा ५ मिनिटे राखून १ गुणाने पराभव केला. रचना तर्फे सेजल यादवने ३:४०, १:४० मिनिटे संरक्षण केले. श्वेता जाधवने नाबाद १, १:४०  मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ खेळाडू बाद केला. काजल शेखने आक्रमणात ३ खेळाडू बाद केले. तर पराभूत मुंबई पोलीसतर्फे प्रिया भोरने १:३०, २:३० मिनिटे संरक्षण करुन आक्रमणात २ खेळाडू बाद केले. ईशाली आंब्रेने आक्रमणात ४ खेळाडू बाद केले. व्यावसायिक महिला गटाच्या दुसऱ्या सामन्यात महावितरण कंपनीने महाराष्ट्र पोस्ट संघाचा (४-५-४-२) ८-७ असा १ गुणांनी पराभव केला.

व्यावसायिक पुरुष गटाचे रोमांचक सामने

व्यावसायिक पुरुष गटाच्या दुसऱ्या सामन्यात मध्य रेल्वेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (७-५-४-४) ११-९ असा २ गुण व ५:३० मिनिटे राखून पराभव केला. मध्य रेल्वेतर्फे मिलिंद चावरेकरने २:१०, २ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात २ गडी बाद केले. संकेत कदमने आक्रमणात ३ गडी बाद केले. विजय हजारेने १:५०, १:३० मिनिटे संरक्षण केले. रिझर्व्ह बँकतर्फे सूरज झोरेने २:४०, १:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. राज सकपाळने २:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले.

व्यावसायिक पुरुष गटाच्या पहिल्या सामन्यात रचना नोटरी वर्क्सने बृहन्मुबंई महानगर पालिकेचा (७-५-६-६) १३-११ असा २ गुणांनी पराभव केला. रचनातर्फे वेदांत देसाईने नाबाद १:३०, २:२० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ४ गडी बाद केले. संकेत जाधवने १:३०, २:०० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. धीरज भावेने २, १:४० मिनिटे संरक्षण करून आक्रमणात १ गडी बाद केला. महानगर पालिकेतर्फे रामचंद्र झोरेने २ मिनिटे संरक्षण करून आक्रमणात ३ गडी बाद केले. पियूष घोलमने आक्रमणात. ६ गडी बाद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *