क्रीडा

जिल्हा कॅरम स्पर्धेत शिवतारा संघ विजेता 

मुंबई : 

लोकमान्य बँक्वेट हॉल, माटुंगा येथे आयोजित केलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ, इंडियन ऑईल व ओ. एन. जी. सी पुरस्कृत ३२ व्या सिनियर मुंबई जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतर क्लब सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात शिवतारा कॅरम क्लबच्या अ संघाने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ना म जोशी मार्ग संघावर २-१ असा विजय मिळवला. त्यांच्या राहुल सोळंकीने ओंकार नेटकेला २१-६, २५-१८ असे हरविले. तर दुसऱ्या एकेरीच्या सामन्यतः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ना म जोशी मार्गच्या अमोल सावर्डेकरने प्रफुल मोरेवर २५-१५, ११-२५, २५-२० असा विजय मिळवून सामन्यात चुरस निर्माण केली. तिसऱ्या आणि निर्णायक दुहेरीच्या लढतीत शिवताराच्या विवेक पोद्दार व सलमान खान जोडीने सचिन पेडामकर व अजय बाभनिया जोडीला २५-०, २२-१३ असा पराभव करून आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत डी. के.सी. सी. अ संघाने विजय मिळविताना ए. के. फॉउंडेशनच्या संघावर २-१ असा विजय मिळविला. त्यांच्या सौरभ मतेने नीलांश चिपळूणकरला १७-१६, ४-२५, २०-१८ असे हरविले. तर नीरज कांबळेने ओंकार टिळकवर २५-५, ४-२५, २३-२२ असे हरविले. दुहेरीच्या सामन्यात ए. के. फाऊंडेशनच्या फ्रांसिस फर्नांडिस व शेख महम्मद रझाने मिहीर शेख व प्रथम मेहताला २५-५, २५-७ असे हरविले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *