
मुंबई :
‘मे’ महिन्यात सुट्टीचा आनंद द्विगुणीत होणार, जेव्हा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर एका पेक्षा एक सुपरहिट मराठी कंटेंट घरबसल्या पहायला मिळणार. महिन्याच्या दर शुक्रवारी तुम्हाला पाहता येणार नवीन रोमांचक सिनेमे, वेब सिरीज आणि साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट. चला तर मग या सुट्टीच्या दिवसांत ओटीटीवरील सुपरहिट मनोरंजनाचा आनंद घेऊया, आणि मे महिन्याच्या सुट्टीला खास बनवूया.
गरुडान : न्यायाच्या जाळ्यात अडकलेलं ‘सत्य’
‘गरुडान’ हा मल्याळम भाषेतील ब्लॉकबस्टर ॲक्शन-ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन अरुण वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट प्रामाणिक पोलीस हरीश माधव आणि प्राध्यापक निशांत यांच्या आयुष्यावर आहे. अनपेक्षितपणे एका गुन्ह्यात अडकलेल्या या दोघांपैकी हरीशला आपली निष्ठावान प्रतिमा जपायची असते तर निशांतला न्याय मिळवायचा असतो. आता दोघे एकमेकांना कसे सामोरे जातील हे बघणं नक्कीच रोमांचक ठरेल. हा सुपरहिट चित्रपट ०९ मे २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर तुमच्या भेटीला येत आहेत.
यंदा सावधान : गोंधळात टाकणाऱ्या लग्नाची गोष्ट
‘यंदा सावधान’ हि एका प्रेमळ जोडप्याच्या लग्नाची गोष्ट आहे. ज्याचे दिग्दर्शन राम पारसेया यांनी केले असून या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १६ मे २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे. घरात आनंदात लग्नाची तयारी सुरू असतानाच कोविड काळ येतो, ज्यामुळे अनेक अडचणी येतात आणि त्यातच काही जण आपल्या जवळच्या लोकांना गमावतात. ही कथा विपरीत परिस्थितीतही टिकणाऱ्या प्रेमाची आणि एकत्र येऊन संकटांवर मात करण्याची प्रेरणा देते.
कबूल है : एक पाऊल सत्याच्या न्यायासाठी
‘कबूल है’ हि एक तमिळ भाषेतील वेब सिरीज आहे जी मराठी भाषेत २३ मे २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ज्याची कहाणी तलाबकट्टा भागातील एका गावात राहणाऱ्या गरीब बापाची आहे जो आपल्या १२ वर्षांच्या अमीना नावाच्या मुलीचं लग्न एका श्रीमंत म्हाताऱ्याशी लावतो. त्याचदरम्यान तलाबकट्टा येथील पोलीस स्टेशनमध्ये भानू नावाच्या पोलिसाची नियुक्ती होते. तो आल्या आल्या मुलांची विक्री आणि तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करतो आणि तपास करताना अनेक लपलेली सत्यं उघड होतात.
फ्रेंड्स : मैत्रीच्या दुनियेतली धमाल कहाणी
फ्रेंड्स हा तमिळ भाषेतील ब्लॉकबस्टर चित्रपट आहे जो ॲक्शन, ड्रामा, कॉमेडी आणि रोमान्सने भरलेला एक दमदार पॉवरपॅक चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धिक यांनी केले आहे. या चित्रपटातील गोष्ट अरविंदन, चंदू आणि कृष्णमूर्ती या तीन जवळच्या मित्रांची आहे. तिघेही खूप चांगले मित्र असतात पण प्रेमाच्या लफडीमुळे त्यांच्यात मित्रांत वाद होतात आणि त्यांच्या मैत्रीला एक वेगळे वळण येते. रहस्यात गुंतवून टाकणारा हा चित्रपट ३० मे २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर तुमच्या भेटीला येत आहेत.
ओवा : एका मध्यमवयीन जोडप्यांची कथा
‘ओवा’ हा मराठी चित्रपट एका लग्न झालेल्या दाम्पत्यांची गोष्ट सांगतो, ज्याचे दिग्दर्शन स्वतंत्र (सवी) गोयल यांनी केले असून या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर प्रीमियर ०२ मे २०२५ ला अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर आला. या चित्रपटातील कथा एका मध्यमवयीन जोडप्याची आहे, ज्यांचं एकमेकांशी अजिबात पटत नसतं. त्या दोघांत छोट्या-छोट्या गोष्टींवरून इतके वाद होतात की शेवटी पत्नी नवऱ्याला आणि घराला सोडून निघून जाते. त्यांच्या सततच्या भांडणामुळे त्यांच्या मुलांवर याचा परिणाम होतो.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “आम्ही प्रेक्षकांसाठी नेहमीच वेगळं आणि दर्जेदार मनोरंजन देण्याचा प्रयत्न करत आलो आहोत. मे महिन्यात सुट्टीचा आनंद अधिक वाढावा म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी ॲक्शन आणि ड्रामाने भरलेला दमदार मराठी कंटेंट घेऊन आलो आहोत. हा कंटेंट केवळ मनोरंजन देणार नाही, तर काहीतरी नवीन शिकण्याची उमेदही मनात निर्माण करेल.”