मुंबई :
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आल्या आहेत. या परीक्षांच्या निकालाच्या संभाव्य तारखा सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आल्या आहे. त्यानुसार हे निकाल १० ते १७ जूनदरम्यान जाहीर होणार आहेत.
सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य तारखांनुसार एमएचटी-सीईटी (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) परीक्षेच्या निकालाची संभाव्य तारीख १० जून रोजी आहे. त्याचप्रमाणे बीएचएमसीटीसीईटीचा निकाला ११ जून, बीए/बीएसी-बी.एड. आणि डीपीएन/पीएचएन या अभ्यासक्रमांच्या सीईटीचा निकाल १२ जून, एमएचएमसीटीचा निकाल १३ जून, नर्सिंग आणि एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रमाच्या सीईटीचा निकाल १६ जून तर बीसीए/बी.बी.सी.ए./बी.बी.ए/ बी.एम.एस./बी.बी.एम. परीक्षेचा निकाल १७ जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.
या सर्व सीईटी परीक्षांचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे.