मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये होणारे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम सत्राचे प्रवेश हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने होणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एम.ए. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क; एम. कॉम.(अकाउंट्स), एम. कॉम. (व्यवस्थापन) एम.एस. सी. (गणित) एम. एस. सी. (माहिती तंत्रज्ञान), एम. एस. सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in या संकेतस्थळावरून भरता येतील. पदव्युत्तर प्रथम वर्षाच्या या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया २२ ऑगस्ट २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे.
पदव्युत्तर प्रथम वर्षासाठीचे एम.ए. (शिक्षणशास्त्र) चे प्रवेश आणि द्वितीय वर्ष एम.ए. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क; एम. कॉम.(अकाउंट्स), एम. कॉम. (व्यवस्थापन) एम.एस. सी. (गणित) एम. एस. सी. (माहिती तंत्रज्ञान), एम. एस. सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया ९ ते २२ ऑगस्ट २०२४ पर्यंत राबवली जाणार आहे. त्याचबरोबर पीजीडीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश ही याच कालावधीत केले जाणार आहेत. या सर्व अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज – https://idoloa.digitaluniversity.ac या संकेतस्थळावरून भरता येतील.
पदवीच्या द्वितीय वर्ष बीए. बीकॉम, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रीया ही सुद्धा ९ ते २२ ऑगस्ट या कालावधीत राबवली जाणार आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सीडीओईचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरु होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय असून यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सीडीओईचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.