मुंबई :
ड जीवनसत्त्वाची पातळी ३० नॅनोग्रॅम/मिलीलीटरहून कमी असणे ही अपर्याप्तता किंवा कमतरता समजली जाते. ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेळे हाडांचे आरोग्य बिघडते आणि अस्थिभंगाचा (फ्रॅक्चर्स) धोका वाढतो. भारतातील स्त्रिया हाडांचे आरोग्य खालावल्याच्या लक्षणांकडे बहुतेकदा दुर्लक्ष करतात, असे अभ्यासांमधून आढळले आहे. अपोलो डायग्नोस्टिक्स/अपोलो क्लिनिक्स ह्यांनी २०२३ मध्ये हॉर्लिक्स विमेन्स प्लसच्या सहयोगाने घेतलेल्या ड-जीवनसत्त्व तपासणी शिबिरांमधील आकडेवारीनुसार, शहरी भारतीय स्त्रियांपैकी सुमारे ८० टक्क्यांमध्ये ड-जीवनसत्त्वाची कमतरता आहे. अंगदुखीची तक्रार करणाऱ्या ८७ टक्के स्त्रियांना अंगदुखी आणि हाडांचे खालावलेले आरोग्य ह्यांच्यातील संबंधाविषयी माहिती नसते आणि त्या तात्पुरत्या वेदनाशामक उपायांचा आधार घेतात, असे २०२३ मधील मॉमस्प्रेसो अभ्यासातही नमूद करण्यात आले आहे.
मुंबईतील अपोलो क्लिनिकमधील जनरल फिजिशिअन डॉ. शालिनी भगत सांगतात, “ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे अन्नातील कॅल्शिअम नीट शोषून घेतले जात नाही. त्यामुळे हाडांचे नुकसान होत राहते आणि हाडांमधील क्षारांची घनता कमी होत जाते. ड जीवनसत्त्वाचा अंतर्भाव असलेली पोषण पूरके नियमितपणे घेत राहिल्यामुळे कॅल्शिअम शोषून घेण्याची व धरून ठेवण्याची शरीराची क्षमता वाढते आणि हाडांच्या बांधणीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेले कॅल्शिअम व फॉस्फरसमधील संतुलन योग्य राखले जाते. ड जीवनसत्त्वाची पूरके घेणाऱ्या स्त्रियांमध्ये हाडांची क्षार घनता पुरेशी असल्याचे आढळले आहे. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी कॅल्शिअम व ड जीवनसत्त्वाचे समृद्ध असलेल्या सुक्ष्मपोषकांची पूरके घेण्यास स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे.”
पुण्यातील अपोलो क्लिनिकमधील कन्सल्टण्ट ऑर्थोपेडिशिअन (अस्थिविकार तज्ज्ञ) डॉ. मयंक पाठक सांगतात, “रजोनिवृत्तीच्या, रजोनिवृत्तीपूर्व किंवा रजोनिवृत्तीउत्तर वयातील स्त्रियांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता होण्याची तसेच हाडे कमकुवत होण्याची शक्यता जास्त असते. ड जीवनसत्त्वाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच नियमित चाचणी करवून घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ड जीवनसत्त्वाने समृद्ध पोषणपूरके कॅल्शिअम शोषून घेण्याच्या क्रियेला चालना देतात आणि हाडांचा बळकटपणा वाढवतात. ही पूरके चांगल्या आहाराच्या जोडीने घेतल्यास स्त्रियांमधील हाडांच्या आरोग्याच्या समस्या दूर ठेवण्यास ते खूपच उपयुक्त ठरते.”
शरीराची त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर तिच्यामध्ये ड जीवनसत्त्व तयार केले जाते. बैठी जीवनशैली, प्रदूषित हवा आणि चार भिंतींच्या आत काम करण्याच्या प्रमाणात झालेली वाढ ह्यामुळे ड जीवनसत्त्वाच्या अभावाचे प्रचलन वाढले आहे.[4] ड जीवनसत्त्वाचे आहारातील स्रोत खूपच मर्यादित आहेत. मेदयुक्त मासे आणि माशांच्या यकृताचे तेल (फिश लिव्हर ऑइल) हे ड जीवनसत्त्वाचे उत्तम स्रोत आहेत; अंड्याच्या पिवळ्या बलकात आणि विशिष्ट प्रकारच्या मश्रुम्समध्येही ड जीवनसत्त्व अल्प प्रमाणात असते. त्यामुळे आहारात पोषणपूरकांचा समावेश करणे हाच ड जीवनसत्त्वाची पर्याप्त पातळी गाठण्यासाठी उत्तम मार्ग आहे.
कॅल्शिअम व ड जीवनसत्त्वाच्या आहारविषयक १०० टक्के शिफारसकृत प्रमाणाचा अंतर्भाव असलेली पोषणपूरके सहज उपलब्ध आहेत. त्यांचे दरही परवडण्याजोगे आहेत आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी ती लाभदाक आहेत. ह्या पोषण पूरकांच्या सेवनासोबतच स्त्रियांनी सूर्यप्रकाशाच्या पुरेशा संपर्कात राहणे तसेच नियमित व्यायाम आदी आरोग्यकारक सवयीही लावून घेतल्या पाहिजेत. सर्वांगीण दृष्टिकोनामुळे त्यांच्या हाडांचे आरोग्य सुधारू शकते आणि अंगदुखीचा त्रास तसेच वयोपरत्वे वाढणारा फ्रॅक्चर्सचा धोका कमी होऊ शकतो.