शहर

मतदानाच्या जनजागृतीसाठी घाटकोपर येथे ‘रन फॉर वोट’

मुंबई : 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघ अंतर्गत अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने उत्फुृतर्त सहभाग नोंदविला.

मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत चार लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजनाबाबत प्रशिक्षण दिले आहे.

मुंबई- उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघांतर्गत मुंबई उपगनर जिल्ह्यातील १७०-घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातील युवकांची मतदानाबाबत जनजागृती करुन मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आज मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. युवकांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पुर्ण करावे. असे आवाहन अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी स्पर्धकांना केले.

प्रत्येक मत हे महत्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आहे. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. ही स्पर्धा म्हणजे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आहे. मोठ्या संख्येने या स्पर्धेत तरूण तसेच ज्येष्ट मतदारांनी सहभाग नोंदविल्याने या सर्वांचे अभिनंदन यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. पाटील यांनी केले.

या स्पर्धेदरम्यान पोस्टर आणि बॅनरवरील संदेशाद्वारे मतदानाबाबत जागृती करण्यात आली. ही स्पर्धा घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे येथून सुरु करण्यात आली होती आणि विक्रोळी येथे ईस्टन एक्सप्रेस हायवेवरील गोदरेज घोडा गेट येथे समाप्त करण्यात आली. मतदारांनी उत्फुस्र्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतला आणि मतदानाचे आपले कर्तव्य बजावण्याचा संकल्प केला. यामध्ये उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *