![](https://voiceofeastern.com/wp-content/uploads/2024/05/51xLyHuokuL-500x470.jpg)
पुणे :
पुरुष व महिला गटाची राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मंगळवेढामध्ये सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशन यांच्या यजमान पदाखाली होणार असल्याची माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी दिली.
पुणे येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या शासकीय परिषदेच्या बैठकीत राज्याच्या विविध स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला असल्याचे डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले. याबाबत अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, कुमार-मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा लातूर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या वतीने तर किशोर- किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मानवत (जिल्हा परभणी) या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. राष्ट्रीय स्पर्धा साधारणपणे नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये होतील. या स्पर्धेच्या अगोदर राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या तारखा निश्चित करण्यात येतील. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे संघ निवडण्यासाठी निवड समिती सदस्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व फिजिओ यांची नियुक्ती सुध्दा जाहीर करण्यात आली आहे.
हिंगोलीत होणार पंच शिबीर
महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे २०२४-२५ या वर्षीचे पंच शिबीर वसमत (जिल्हा हिंगोली) या ठिकाणी ऑगस्टमध्ये आयोजित केले जाणार आहे. ज्यामध्ये खो-खो मध्ये समाविष्ट होत असलेल्या व बदल झालेल्या विविध नियमांवर चर्चा होऊन उजळणी सुध्दा घेतेली जाते.
ॲथलिट कमिशनची स्थापना
भारत सरकारचे क्रीडा खाते व भारतीय खो-खो महासंघाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांच्या मार्गदर्श्नाखाली महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने त्वरेने ॲथलिट कमिशनची स्थापना केली आहे. अशी समिती स्थापन करणारी महाराष्ट्र खो-खो असोसिएशन बहुदा पहिली राज्य संघटना असावी. ही समिती खेळाडूंवर कोणताही अन्याय होणारा नाही, त्यांना योग्य न्याय दिला जातोय की नाही याकडे लक्ष देईल. त्याच बरोबर या समितीचा एक प्रतिनिधी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व सभेत खेळाडूंचे प्रतिनिधित्व करेल. खेळाडू नोंदणी व खेळाडूंचे हित ही समिती जपेल.
निवड समित्या
- पुरुष – महिला (खुला गट) : जगदीश दवणे (पालघर), मंदार कोळी (ठाणे), विशाल भिंगारदेवे (सांगली), गौरी भगत (सातारा).
- कुमार – मुली (१८ वर्षाखालील) : प्रशांत कदम (सातारा), रमेश नांदेडकर (नांदेड), संदीप चव्हाण (पुणे), भावना पडवेकर (ठाणे).
- किशोर – किशोरी (१४ वर्षाखालील) : अमोल मुटकुळे (हिंगोली), विशाल पाटील (जळगाव), राजाराम शितोळे (सोलापूर), वर्षा कच्छवा (बीड).
संघ प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक: राष्ट्रीय स्पर्धा :
- पुरुष गट : डॉ. नरेंद्र कुंदर ( मुंबई उपनगर), डॉ. पवन पाटील (परभणी).
- महिला गट : नरेंद्र मेंगळ (ठाणे),अनिल रौंदाळ (नंदुरबार).
फेडेरेशन चषक :
- पुरुष गट : पंढरीनाथ बडगुजर (धुळे),
महिला गट : जगदीश दवणे (पालघर), विजय जाहेर (बीड) - कुमार गट : प्रताप शेलार (ठाणे), युवराज जाधव (सांगली),
- मुली गट : श्रीकांत गायकवाड (मुंबई), सुप्रिया गाढवे (धाराशिव).
- किशोर गट : विकास सूर्यवंशी (छ. संभाजीनगर), राहुल पोळ (जळगाव).
- किशोरी गट : अतुल जाधव (सोलापूर), विकास परदेशी (अहमदनगर)
- फिजिओ :- डॉ. अमोल कुटाळे (सातारा), डॉ. अमित राव्हाटे (सांगली)