क्रीडा

८ वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : पुण्याचा सुखबिंदर कटनोरिया चौथ्या फेरीत दाखल

कोल्हापूर :

श्री दत्तराज चारिटेबल ट्रस्टच्यावतीने हॉटेल मंगलम येथे सुरु असलेल्या कै. अशोक पुजारी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या तिसऱ्या फेरीत पुण्याच्या सुखबिंदर कटनोरियाने माजी राष्ट्रीय विजेत्या मुंबईच्या संदीप देवरूखकरचा १५-१२, २५-११ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव खळबळ उडविली आणि चौथी फेरी गाठली.

नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी स्पर्धा प्रमुख व श्री दत्तराज पतसंस्थेचे अध्यक्ष हर्षद पुजारी, संचालक अवधूत पुजारी, राज्य कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, कोल्हापूर जिल्हा हौशी कॅरम संघटनेचे सचिव विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल :

  • नईम अंसारी (जळगाव) वि वि दिनेश केदार (मुंबई) २५-९, १२-१७
  • पंकज पवार (मुंबई) वि वि ओंकार टिळक (मुंबई) २५-२०, २०-१८
  • अर्शद खान (रायगड) वि वि सार्थक नागावकर (मुंबई) २५-९, २५-१
  • रवींद्र हांगे (पुणे) वि वि जितेश कदम (मुंबई उपनगर) २५-१६, २५-१
  • रहिम खान (पुणे) वि वि विलास आंबवले (ठाणे) २५-५, २५-७
  • प्रकाश गायकवाड (पुणे) वि वि निशार शेख (मुंबई) २१-३, २५-०
  • रियाझ अकबर अली (रत्नागिरी) वि वि निलेश परब (मुंबई) १६-७, २५-०
  • अशोक गौर (मुंबई) वि वि सौरभ मते (मुंबई) २५-४, २५-१०
  • फहिम काझी (मुंबई) वि वि अख्तर शेख (कोल्हापूर) २५-०, १७-९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *