शिक्षण

सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रियांच्या संभाव्य तारखा जाहीर

मुंबई :

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांपैकी कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला ४ जुलैपासून सुरूवात झाली. त्यापाठोपाठ सीईटी कक्षाकडून अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखाही जाहीर करण्यात आल्या. यामध्ये तंत्रशिक्षण विभागाच्या १० अभ्यासक्रमांचा तर उच्च शिक्षण विभागाच्या आठ अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला कधीपासून सुरूवात होणार अशी विचारणा विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये होणारा संभ्रम दूर करण्यासाठी सीईटी कक्षाकडून ४ जुलै रोजी तंत्र शिक्षण व उच्च शिक्षण विभागातंर्गत असणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या. यामध्ये अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या थेट द्वितीय वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियांचाही तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

असे आहे संभाव्य वेळापत्रक

तंत्रशिक्षण विभाग

  • एमसीए – ६ जुलै
  • एमबीए/एमएमएस – ९ जुलै
  • एमई/एम.टेक- ९ जुलै
  • एम.आर्क- ९ जुलै
  • बीई/बी.टेक – १० जुलै
  • बी.फार्मसी/ फार्म डी – ११ जुलै
  • बी.एचएमसीटी- ११ जुलै
  • बी.डिजाइन -१२ जुलै
  • एम.फार्म- १३ जुलै
  • एम.एचएमसीटी- १३ जुलै
  • डायरेक्ट सेकंड एअर इंजीनियरिंग (डीएसई)- १६ जुलै
  • डायरेक्ट सेकंड एअर फार्मसी (डीएसपी)- १६ जुलै

उच्च शिक्षण विभाग

  • एलएलबी 5 वर्ष- ८ जुलै
  • बीए/बीएससी-बी.एड- ८ जुलै
  • बी.एड-एम.एड -८ जुलै
  • एलएलबी 3 वर्ष- १० जुलै
  • बी.पी. एड -११ जुलै
  • एम.पी. एड- ११ जुलै
  • बी.एड -१२ जुलै
  • एम.एड- १२ जुलै

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *